Ad will apear here
Next
चित्पावन मंडळाच्या मुलींच्या वसतिगृहात कक्षाचे नामकरण
यशोदय कक्ष नामकरण सोहळ्याप्रसंगी देणगीदार यशवंत जोशी, सौ. शुभदा जोशी, राजन पटवर्धन, डॉ. संतोष बेडेकर, डॉ. सुभाष देव, राजाभाऊ लिमये, श्रीनिवास जोशी, नारायण शेवडे.

रत्नागिरी : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य तथा केळकर हायस्कूल (वाडा, ता.  देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथील निवृत्त शिक्षक दांपत्य यशवंत व शुभदा जोशी यांनी मंडळाच्या ब्राह्मण मुलींच्या वसतिगृहाला पाच लाख रुपयांची देणगी दिली. त्यांच्या देणगीतून वसतिगृहातील कक्षाचे यशोदय कक्ष असे नामकरण करण्यात आले.

मंडळाचे ल. वि. केळकर विद्यार्थी वसतिगृह अनेक वर्षे सुरू आहे. मुलींच्या शिक्षणासाठी दोन वर्षांपासून जोशी पाळंद येथे वसतिगृह सुरू करण्यात आले. त्यातील कक्षाला जोशी यांच्या देणगीतून नाव देण्यात आले. या कार्यक्रमाला यशवंत जोशी, सौ. शुभदा जोशी, कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, कार्यवाह राजन पटवर्धन, सदस्य नारायण शेवडे, डॉ. संतोष बेडेकर, डॉ. सुभाष देव यांच्यासमवेत मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

बोलताना देणगीदार यशवंत जोशी.

या वेळी बोलताना डॉ. देव म्हणाले, ‘मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, चांगले संस्कार होण्यासाठी जबाबदार पालकाची गरज असते; तसेच मुलांना समाजात चांगले शिक्षण आणि त्यासाठी राहण्याची चांगली सोय हवी. चित्पावन मंडळाने ही सोय करून त्यांच्यावर जबाबदार पालक म्हणून लक्ष ठेवले आहे. समाजात अशा वसतिगृहांची गरज आहे.’

यशवंत जोशी यांनी ल. वि. केळकर वसतीगृहाची आधीची परिस्थिती आणि सध्याची स्थिती याबद्दल आनंद व्यक्त केला; तसेच मुलींच्या वसतिगृहाबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व नारळ बोर्डाचे माजी संचालक राजाभाऊ लिमये मुलांचे वसतिगृह पाहून त्याबद्दल समाधान व्यक्त केले. 

श्रीनिवास जोशी यांनी प्रास्ताविक करताना वसतिगृहाची माहिती दिली. काहींनी मनोगत व्यक्त करत सरांबद्दल असणारे प्रेम व्यक्त केले. वसतिगृहातील विद्यार्थिनी पूर्वा जोगळेकर हिने सूत्रसंचालन केले. या वेळी मंडळाचे सभासद उपस्थित होते.

यशवंत जाेशी यांचा सत्कार करताना  डॉ. सुभाष देव
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZPMCA
Similar Posts
आता रत्नागिरीतही लुटा स्कूबा डायव्हिंगचा आनंद रत्नागिरी : निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेल्या कोकणातील रत्नागिरी हे एक निसर्गरम्य शहर. रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांना आता निसर्गसौंदर्यासोबतच समुद्रातील सौंदर्यही अगदी जवळून न्याहाळता येणार आहे.
‘हॅम्लेट’च्या कलाकारांशी रत्नागिरीत गप्पागोष्टी रत्नागिरी : जिल्हा नगर वाचनालय आणि चतुरंग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वाचनालयाच्या सभागृहात तीन फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी पाच वाजता ‘हॅम्लेट- एक शिवधनुष्य’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. यात ‘हॅम्लेट’मधील कलाकारांशी मुलाखत वजा गप्पागोष्टींचा कार्यक्रम रंगणार आहे.
‘अभंगवाणी’त रंगले रत्नागिरीकर रसिक रत्नागिरी : आषाढी एकादशीला उदयोन्मुख, युवा कलाकारांनी सादर केलेल्या अभंगवाणी कार्यक्रमात रत्नागिरीकर रसिक रंगून गेले. ‘सप्तसूर म्युझिकल्स’ची निर्मिती असलेला हा कार्यक्रम अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळाच्या भगवान परशुराम सभागृहात झाला. विविध संतांच्या रचना गायकांनी सुरेल आवाजात सादर केल्या
रत्नागिरीत द्विजिल्हास्तरीय तबलावादन स्पर्धा रत्नागिरी : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांच्या पातळीवरील तबलावादन स्पर्धा १५ ऑक्टोबरला रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या वर्षी प्रथमच होणाऱ्या या स्पर्धेदरम्यान प्रख्यात तबलावादक फजल कुरेशी, र्‍हिदम अ‍ॅरेंजर नितीन शंकर व राकेश परिहस्त यांची जुगलबंदी अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language